विकसित महाराष्ट्र 2047 साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
रायगड (जिमाका)दि.10:- विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध 16 क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत -भारत @ 2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवावे.
Comments
Post a Comment