मुरुड तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी
रायगड(जिमाका),दि.9 :- मुरुड तालुक्यातील, मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूकनियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे सन 2025-2030 चे निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. मुरुड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारणकरीता राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्या ग्रामपंचायतीपैकी सोडत सरपंचपदे आरक्षित करण्यासाठी दि.15 जुलै 2025 रोजीसकाळी 11.00 वा. पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, मुरुड येथे सभा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी, उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार मुरुड आदेश डफळ यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment