ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता

 


 

रायगड,दि.10(जिमाका) :-जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी दुर्गम डोंगराळ भागातून येत असतात. सर्व सामान्यासमवेत गरीब गरजू रुग्ण येत असून त्यांची तापसणी व उपचार जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मोफत होतात. याकरिता ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातर्फे ओ.एन.जी.सी. प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, ओ.एन.जी.सी.चे जीजीएम प्लांट मॅनेजर  डी. के. त्रिवेदी, सिजीएम सपोर्ट मॅनेजर  एस.के. चांद, जी.एम. हेड एचआर  श्रीम. भावना आठवले, मॅनेजर एचआर  गौरव पतंगे, इन्चार्ज सीएसआर  अंकुर देसाई, सी एस आर को-ओर्डीनेटर अभिषेक पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी-घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक  राजेश किणी, अधिपरिचारिका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिपरिचारिका श्रीम. अनिता भोपी, इन्चार्ज सिस्टर सुविधा दवटे, उषा वावरे, पी.एच.एन. नंदिनी चव्हाण, तसेच नर्सिंग अधिकारी सारिका पाटील आदी मान्यवरांसहित जि. सा. रु. चे विविध विभागातील सर्व कर्मचारी  उपस्थित होते.

              ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या समन्वयाने थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाकरिता लॅप्रोस्कोपिक उपकरणे, तसेच जिल्हा रुग्णालय व सहा उपजिल्हा रुग्णालयाकरिता रोटरी क्लबच्या सहयोगाने कॉटरी मशीन व रवींद्र जोशी फाउंडेशनच्या माध्यमातून सहा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाकरिता डेंटल उपकरणे  उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

               हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजित आभार प्रदर्शन कार्यक्रमात ओ.एन.जी.सी. प्रशासनाच्या सर्व मान्यवरांसमवेत थिंक शार्प फाउंडेशनचे अमित कुटवळ, रोटरी क्लबचे मिथुन गडा व रवींद्र जोशी फाउंडेशनचे संतोष केळकर यांचा सन्मान करण्यात आला. 

               या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शीतल जोशी-घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रतिम सुतार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश मोकल, सुनील चव्हाण, मनोज म्हस्के,  अर्जुन बहुरे, संजय माने, नवनाथ घरत,  रुपेश म्हात्रे, रवींद्र कदम, श्रीम.सुविधा चिम्बुलकर, श्रीम प्रिया चौलकर, श्रीम.कीर्ती कुंभार, श्रीम. रुपाली पाटील, श्रीम. प्रीती भगत आदींनी परिश्रम घेतले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड