स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा व सुका निळा मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

 


        रायगड(जिमाका)दि.11:- पावसाळयामध्ये  दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक जलजन्य आजार होतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जुंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येईल. यासाठी गावस्तरांवर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.  यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिले. 

जिल्हास्तरीय कार्यशाळेस  प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी (आरोग्य) वंदनकुमार पाटील, प्रकल्प व्यवस्थापक आर्थिक (जजीमि) संगीता पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते.

 मान्सून हंगामामध्ये जिल्हयांतील ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखून जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलबध करून देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनसुार जिल्हयांत स्टॉप डायरिया अभियान राबविले जात आहे. या अभियानामध्ये गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र  येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.   जिल्हयांत स्टॉप डायरिया व स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा व सुका निळा हे दोन्ही अभियान प्रभावीपणे राबवावे असे श्री बास्टेवाड यांनी सांगितले.

 पाणी गुणवत्ता सल्लागार अदिती मगर यांनी अभियान कालावधीत राबविण्यात येणा-या विविध उपक्रम, FTK किटव्दारे पिण्याच्या पाण्याची तपासणी याबाबत माहिती दिली.  माहिती,शिक्षण,संवाद सल्लागार नेहा थळे यांनी या अभियानांमध्ये विविध स्तरांवर घेण्यात येणारे जनजागृतीचे उपक्रम याबाबत उपस्थितांना मागदर्शन केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा या अभियानाबाबत संवाद तज्ञ सुरेश पाटील यांनी उपस्थितांना  मागदर्शन केले.

या कार्यकमांचे प्रास्ताविक मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर यांनी केले तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी  स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग या दोनही अभियानाबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करून रायगड जिल्हा प्रथम क्रमांकांवर अग्रेसर राहिल यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. रोगप्रसार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देऊन जिल्हयातील प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले.

या कार्यशाळेस विस्तार अधिकारी (पंचायत व आरोग्य),गटशिक्षणाधिकारी,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ,उपअभियंता (ग्रापापु),गट व समूह समन्वयक,पाणी गुणवत्ता समन्वयक व  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड