आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होईल आदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन

 


   रायगड , दि.६:-- उपजिल्हा  रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असून  रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.  आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी अदिती तटकरे यांनी केले. 

         माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉ .अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.   

   यावेळी  तटकरे पुढे म्हणाल्या की,डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटर या सेवांमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.  लवकरच माणगांव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करण्यात येणार आहे.

      यावेळी  राजीव साबळे,  प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नीलिमा घोसाळकर,  विपुल उभारे,  क्रिश्ना डायग्नोस्टीक्स कार्यकारी संचालक पल्लवी जैन, वैद्यकीय अधीक्षक अरुणा पोहरे,  शादाब गैबी,  संजय अण्णा साबळे, सुमित काळे,  सुनील पवार आदी उपस्थित होते.

    माणगांव हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे अशा इतर आरोग्य सेवा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रिश्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे डायलिसिस व सिटी स्कॅन सेंटर सुरू झाले आहे.ही सेवा सुरू होत असल्याने रुग्ण व नागरीकांना लाभ होईल.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड