गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना जाहीर


        रायगड,(जिमाका) दि.८:- महाराष्ट्र शासन कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागशासन निर्णयनुसारराज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी प्रतिलिटर रक्कम रु. ५/- अनुदानगाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आहे. तसेच दूध भुकटी भारताबाहेर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना रु. ३०/- प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान अनुज्ञेय करण्यांत येत आहे. सदर योजना दि.१ जुलं २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीपर्यंत लागू राहील. तरी रायगड जिल्हयातील सहकारी संस्थमार्फत/ खाजगी संस्थेमार्फतसहकारी दूध संघास खाजगी दूध प्रकल्पास दूध पुरवठा करत असल्याससदरच्या सहकारी दूध संघास / खाजगी दूध प्रकल्पास या योजनेमध्य सहभागी होण्यासाठी त्यांचा अर्ज मा. आयुक्तदुग्धव्यवसाय विकासमहाराष्ट्र राज्य यांना ddemaharashtra@gmail.com या ई मेल आयडीवर सादर करावा. अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

       सहकार / मल्टीस्टेट दूध संघासाठी संघाचे लेटरपॅडवर अर्जया अर्जासोबत सहकारी दूध संघाचे नांदणी प्रमाणपत्र, FSSI चे प्रमाणपत्रअनुदान योजनेस सहभागी होण्यासाठी संघाचा ठराव.

       खाजगी दूध प्रकल्पांसाठी खाजगी दूध प्रकल्पाचे लेटरपॅडवर अर्जओद्यागिक विभागाचे कारखाना नांदणी प्रमाणपत्र, FSSI चे प्रमाणपत्रअनुदान योजनेस सहभागी होण्यासाठी खाजगी दूध प्रकल्पाचा ठराव.

      प्रस्तुत अनुदान योजना ही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू राहील. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांकडील जनांवरांची नोंदणी (Eae Tag) भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचा आधार कार्ड त्याचे बँक खात्याशी लिंक असावाव तो भारत पशुधन पोर्टलवर नांद असावा. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारीरायगड मो. क्र. ८३७८९८८७७७ यांचेशी संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड