वरंध घाट 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

 

 

रायगड(जिमाका)दि.10:- रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड- वरंध घाट हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग क्र.15 नवीन अधिसूचित पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी किमी 60/000 (राजेवाडी) ते किमी 82/00 (वाघजाई मंदिराजवळ) या ठिकाणी दि.19 जून 2024 रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी किमी 60/000 (राजेवाडी) ते किमी 81/600 (रायगड जिल्हा हद्द) वरंध घाट दरम्यानची सुमारे 21.600 कि.मी. लांबी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्याने जिवीत व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाची परिस्थितीनुसार या भागातील डोंगररांगामधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी किमो 60/000 (राजेवाडी) ते किमी 81/600 हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतूकीसाठी दि.31ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.

त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड