खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन योजनेअंतर्गत अर्ज मागविले *प्रशिक्षण, ५० टक्के अनुदान, तांत्रिक सहाय्य

 


 रायगड, दि .5:--महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्चीत झालेली आहे. अनुदाना करीता पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेची  मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येते.

महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांचा शासन निर्णय क्र. केव्हीबी २०१७/प्र.क्र. १६/उद्योग ६, दि. १८ जुन २०१९ अन्वये वैयक्तिक मधपाळ अथवा केंद्रचालक संस्थासाठी योजनेतील प्रमुख घटक,अटी  शर्ती  आणि पात्रता पुढील प्रमाणे आहेत.

 अशा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही  व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था पात्रता संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्यावर घेतलेली किमान १००० चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेले सेवा असावीत.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षण, मध व्यवसाय सुरू करणे संबंधी पात्रता-
 अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त. १० दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य

केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ व्यक्ति पात्रता किमान १० वी पास, वय वर्ष २१ मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, ठीकर नाका, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार
समोर, अलिबाग, रायगड

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड