उडान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती


       रायगड, (जिमाका) दि .8:-  10 वी आणि 12 वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान- GSP India (https://www.gspindia.org/udaan-scholarship) SKF India, Sandvik Coromant आणि Atlas Copco यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील दिव्यांग युवकांसाठी उडान शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती.

       ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान GSP India ही संस्था मागील 42 वर्षांपासून ग्रामीण भागातील दिव्यांग युवकांसाठी काम करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमात महाराष्ट्रातील निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सहाय्य केले जाते.

        उडान शिष्यवृत्तीचे पात्रता निकषतुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वाचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.  तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तुम्ही 11 वी किंवा डिप्लोमाला प्रवेश घेतला असेल तर 10 वी मध्ये कमीत कमी 60% गुण आवश्यक आहेत. तुम्ही पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला असेल तर 12 वी मध्ये कमीत कमी 60% गुण आवश्यक आहेत.

उडान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी  https://forms.gle/85gedhXuqsiSUCVGA या नावनोंदणीच्या  लिंक वरून फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकता. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला विस्तृत अर्ज सादर करण्यासाठी लिंक मिळेल. या  शिष्यवृत्ती अंतर्गत  शिक्षणासाठीचे संपूर्ण शैक्षणिक सहाय्यएक लाखापर्यंत आर्थिक तरतूद गरजे नुसार सहाय्यक उपकरणेमार्गदर्शनक्षमता बांधणी आणि करिअर समुपदेशन सहाय्य मिळेल. नावनोंदणीची शेवटची तारीख  15 जुलै 2024 पर्यंत आहे.

000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड