जुनी रद्दी विक्रीसाठी इच्छुक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

 

रायगड(जिमाका)दि.11:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित काढण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खरेदीदारांकडून दि.10 जुलै  ते दि.22 जुलै 2024 (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा मागविण्यात येत असून पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सचिन विधाते यांनी केले आहे.

मागविण्यात आलेल्या निविदा दि. 23 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनेवल, केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल येथे उघडण्यात येतील.

 निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टिन नंबर व जी.एस.टी. भरल्याबाबत रिटर्न, पॅनकार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रूपये 10 हजार या राष्ट्रीय बँकेचा डी.डी. (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल RTO PANVEL यांचे नावे), दरपत्रक सादर करताना ते प्रति किलो मध्ये सादर करावेत,  बंधपत्र रूपये 100/- (ज्यांचे टेंडर मंजूर करण्यात येईल त्याचे आवश्यक नियमाबाबतचे बंधपत्र लागेल), पेपरमील मालक/व्यवस्थापक हे रद्दी विकत घेत असतील तर पेपरमील त्यांच्या मालकीची आहे. याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच पेपरमील मालक व्यवस्थापक यांना आपण रद्दी पुरवठा करताना याबाबतचा संबंधीत पेपरमीलचा दाखला आणणे आवश्यक आहे,. प्राप्त झालेल्या निविदा मान्य करण्याचे वा रद्द करण्याचे सर्व अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी

राखून ठेवले आहेत, मागविण्यात आलेल्या निविदा या आधीच्या अटी व शर्तीची पूर्तता करीत नसल्यामुळे रद्द समजण्यात याव्यात. दि.22 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत कार्यालयास प्राप्त झालेल्या निविदांचाच विचार करण्यात येईल. त्यानंतर उशिराने प्राप्त होणाऱ्या निविदांचा कोणताही विचार केला जाणार नाही. निविदा दि.23 जुलै 2024 रोजी रोजी, दुपारी 3.00 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचे कक्षात उपस्थित निविदाधारकां समक्ष उघडण्यात येतील.

दरपत्रक निविदा सादर करण्याचा पत्ता :-प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल. केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला, लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड