अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                 वृत्त क्र. 696

अलिबाग जिल्हा रुग्णालयात
राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

अलिबाग, दि.28:- आयुष कार्यक्रमांतर्गत  आज अलिबाग येथील  जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली.
            या कार्यक्रमांस, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्य् चिकित्सक  डॉ.ननावरे,, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आयुष अधिकारी,डॉ.चेतना पाटील तसेच  आयुर्वेद व आहारतज्ञ डॉ. भक्ती पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी मधुमेह जनजागृती अभियानासाठी आयुष विभाग रायगडद्वारे मुद्रीत केलेल्या माहिती पत्रकाचे अनावरण जिल्हा शल्य चिकित्सकांच्या  हस्ते करण्यात आले.
            भगवान धन्वंतरी हे आरोग्य शास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. संपूर्ण देशात आरोग्य संवर्धनासाठी धन्वंतरी जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे निमित्त साधून आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त 28 ऑक्टोबर 2016 ते 14 नोव्हेंबर 2016 या कालावधीत मधुमेह जनजागृती अभियान राबविण्यात येत  आहे. यात "आयुर्वेदाद्वारे मधुमेहाचे निराकरण व प्रतिबंध"असा विषय असून या अभियानात मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येणार आहेत.
या अभियानासाठी आयुर्वेद व्यासापीठाद्वारे तयार केलेल्या सर्वसामान्य लोकांना समजण्यास सोपे असे   "आहारातून आरोग्याकडे" हे ध्वनी‍चित्रमुद्रीत सादरीकरण व व्याख्यान डॉ.भक्ती पाटील यांनी केले. चुकीच्या आहार विहाराच्या सवयी व त्यातून उदभवणारे मधुमेहासारखे जीवनशैली संबंधित आजार टाळण्यासाठी आयुर्वेदीक आहारविहार, प्राणायाम,अन्न शिजविण्याच्या योग्य पद्धती आणि रोग  उद्भविल्यास चिकित्सा व उपचार पद्धती कशा उपयुक्त ठरु शकतात हे त्यांनी अत्यंत ओघवत्या व सोप्या पद्धतीने सर्वांसमोर मांडले.
            या कार्यक्रमांस आयुष कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड