कशेळे व पाथरज येथील भात खरेदी सुरु होणार

दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 693
                                             कशेळे व पाथरज येथील
                                            भात खरेदी सुरु होणार
        अलिबाग दि. 28:-  आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम 2016-17 मध्ये आदिवासी उपाय योजना क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ या अभिकर्ता संस्थेमार्फत रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कशेळे व पाथरज येथील भात खरेदी केंद्रावर भात खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. खरीप पणन हंगाम  कालावधीत 24 ऑक्टोबर 2016 ते 31 मार्च 2017, रब्बी पणन हंगामाकरिता  1 मे  ते  30 जून 2017 असा आहे.
            भात खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. सदरहू उताऱ्यातील  धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या  7/12 उताऱ्यानुसार पीकाखालील क्षेत्र, या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी) पीकाचे सरासरी उत्पादन या  बाबी विचारात घेऊन धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. सदर धानाची खरेदी ही ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता धान खरेदी केंद्रावर  आणताना प्रत्येक शेतकऱ्याने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले,परंतु  खरेदी न झालेले धान/भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील.
            भाताचे प्रकार-  अ ग्रेड भात आधारभूत किंमत प्रती क्विंटल रुपये 1510/- शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रति क्विंटल रुपये 1510/- तसेच सर्वसाधारण भाताची आधारभूत किंमत प्रती क्विंटल रुपये 1470/- तर शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रती क्विंटल रुपये 1470 अशी राहील.
            आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्जाचेच  धान/भरडधान्य खरेदी करण्यांत येईल. केंद्र शासनाने हंगाम 2016-17 करिता आद्रतेचे अधिकतम प्रमाण  धानासाठी 17 टक्के विहीत केले आहे. या प्रमाणपेक्षा आद्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यांत  येणार नाही. भात खरेदी करतांना ओलावा व आद्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करुनच  धान/भरडधान्याची खरेदी करण्यांत येईल.  
           शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते नसल्यास अथवा  अपवादात्मक परिस्थितीत  शेतकऱ्यांना देय रक्कम रेखांकित धनादेशाव्दारे  अदा करावी, भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली  गावे  यांची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ मर्या./तहसिलदार/गट विकास अधिकारी पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह.संस्था/खरेदी विक्री संघ/सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील. 

                                                                  0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक