एडस् विषयी प्रभावी जनजागृती करावी - अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                       वृत्त क्र. 694
                                                एडस् विषयी प्रभावी
                                                  जनजागृती करावी
                                                        -  अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

            अलिबाग दि. 28:- एच.आय.व्ही.एडस् विषयी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांच्या अध्यक्षतेखाली डीएपीसीसी कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रोजू पाटोदकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे एआरटी केंद्रामध्ये औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी सीडी-4 काऊंट मशीन डीपीडीसी फंडातून उपलब्ध करुन घेण्यासाठी  प्रस्ताव पाठवावा असे सांगून श्री. मलिकनेर पुढे म्हणाले की, एचआयव्ही तपासणी पासून कोणतीही गरोदर माता वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. एआरटी केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना एस.टी.प्रवासामध्ये सवलत मिळण्याकरिता पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले.
            बैठकीच्या सुरुवातीला कार्यक्रम व्यवस्थापक श्री.माने यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मागील कामाची माहिती दिली.

                                                                  0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक