पन्नास कोटी वृक्ष लागवडीसाठी सर्व विभागांचे योग्य नियोजन आवश्यक --अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

दिनांक:-27/10/2016                                                   वृ.वि.क्र. 691
पन्नास कोटी वृक्ष लागवडीसाठी
सर्व विभागांचे योग्य नियोजन आवश्यक
                                       --अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

अलिबाग दि.27:- येत्या 3 वर्षात म्हणजे 2019 पर्यंत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीची महायोजना शासनाने आखली असून ही यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
            यावेळी वन विभाग अलिबागच्या उप वन संरक्षक श्रीमती   बॅनर्जी, रोहा विभागाचे उप वन संरक्षक  विजय सुर्यवंशी,उपविभागीय अधिकारी माणगांव विश्वनाथ वेटकोळी, सामाजिक वनीकरण उपसंचालक विद्याधर जुकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर,  तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            बैठकीत पुढे मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, 2017 ते 2019 या तीन वर्षात जिल्हयाला 1 कोटीचे उद्दिष्ट असून त्यापैकी जवळपास दहा लाखाचे उद्दिष्ट 2017 या वर्षासाठी आहे. यात अलिबाग व रोहा वन विभाग तसेच अन्य विभाग यांनी मिळून हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.या साठी कालबद्ध कार्यक्रम देखील आखण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व विभागांनी आपले सुनिश्चित नियोजन करुन तसा आराखडा विहीत वेळेत सादर करावा. मंत्रालय पातळीवर या सर्व कार्यक्रमांची सविस्तर नोंद होत आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्याबाबत उद्दिष्टांपेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचे ठरवावे.
            श्रीमती बॅनर्जी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे 50 कोटी वृक्ष लागवडीची योजना सर्वांना समजावून सांगितली. या बैठकीला माणगांव तहसिलदार श्रीमती  उर्मिला पाटील, महाड तहसिलदार औदुंबर पाटील, रोहा तहसिलदार सुरेश काशिद तसेच वन विभागाचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक