आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रे सुरु

दिनांक :- 28 ऑक्टोबर  2016                                                      वृत्त क्र. 695
                                         आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी
                                                ग्राम बाल विकास केंद्रे सुरु


            अलिबाग दि. 28:-  आदिवासी बालकांचे कुपोषण कमी करुन बाल मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून  नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे . याअंतर्गत जिल्हयात नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्राम बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) अलिबागमध्ये 19 तर कर्जतमध्ये 5 अशी एकूण 24 केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.  
            सहा वर्षाखाली  सॅम मॅम बालकाचे प्रमाण कमी करुन कुपोषणामुळे होणारे बाल मृत्यू कमी करण्यासाठी गाव पातळीवर 30 दिवसांच्या कालावधीत बैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निरिक्षणाखाली आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना मार्फत आहार व आरोग्यसेवा देऊन प्रशिक्षणाव्दारे मातांचे बालसंगोपनासाठी सक्षमीकरण करणे हे ग्राम बाल विकास केंद्राचे मुख्य उद्ष्टि आहे.
            अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पर्यवेक्षिकेने अंगणवाडी केंद्रासाठी 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या व कमी वजनाच्या सर्व बालकांची लांबी उंची व वजन स्वत:घेऊन वजन तक्त्याचा वापर करुन सॅम मॅप बालकांची प्राथमिक सुची तयार करावी लागते. दंड घेर मापक पट्टीने घेर मोजून सॅम मॅप बालकाची निवड करावी लागते. अशा प्रकारे महिन्यांतून चार वेळा वजन घेतले जाते. अंगणवाडयांच्या दोन वेळच्या आहाराशिवाय या बालकांना सकाळी 8.00 व  सायंकाळी  6.00 वाजता आमायलेज युक्त पिठाची  लापशी, शिरा , उपमा,धपाटे देण्यात येतात. तसेच दुपारी 4.00 वाजता अंडी न खाणाऱ्या बालकांना केळी व उकडलेले बटाटे/बटाटयाची पाककृती देण्यात येतात. अशा प्रकारे दररोज बालकांना घरचा आहार तीनवेळा, अंगणवाडीतील आहार दोनवेळा व अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्रामार्फत दिला जाणारा आहार तीनवेळा असा एकूण आठवेळा आहार दिला जातो. तसेच औषधेही पुरविली जातात. शेवटच्या दिवशी (30 दिवसांनी) किती वाढ झाली याची पहाणी केली जाते.

                                                            0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक