मतदार याद्यांचा विशेष पुररीक्षण कार्यक्रम




अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) :भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 11 नोव्हेंबर 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राबविला जात आहे.  सदर कार्यक्रम सुधारीत केला असून या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती निकाली काढणे,मतदार नोंदणी विशेष मोहिम राबविणे व अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी पुढीलप्रमाणे.  एकत्रितकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे शुक्रवार दिनांक 13 मार्च 2020.  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार दि.13 मार्च 2020 ते बुधवार दि.15 एप्रिल 2020.  विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार दि.28 मार्च  आणि रविवार दि.29 मार्च 2020 तसेच शनिवार दि.11 एप्रिल व रविवार दि.12 एप्रिल 2020.  दावे व हरकती निकालात काढणे गुरुवार दि.30 एप्रिल 2020 पूर्वी.  प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे बुधवार दि.06 मे 2020 पूर्वी.  डेटाबेसचे अद्यावतीकरणे आणि पुरवणी याद्याची छपाई सोमवार दि.11 मे 2020 पूर्वी.  मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे शुक्रवार दि.15 मे 2020. 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकांवर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  तसेच शनिवार दिनांक 28 मार्च 2020, रविवार दि.29 मार्च 2020, तसेच शनिवार दि.11 एप्रिल 2020, व रविवार दि.12 एप्रिल 2020 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.  सदर कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर व मतदार केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.  तसेच नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासणीसाठी दिनांक 13 मार्च 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने ज्या पात्र नागरिकांचे, दिव्यांग व्यक्ती,महिला विशेषत: तरुण वर्गाचे नाव मतदार  यादीमध्ये समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी चालू विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये नाव समाविष्ट करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक