माथेरान पर्यटन स्थळावर जाण्यास सर्व पर्यटकांना बंदी आदेश जारी



अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897,दि.13 मार्च 2020 लागू करण्यात आलेला आहे.  रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात.  यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्याद्वारे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी टाळून विषाणू संसर्गाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक आहे.
त्यानुसार करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक  उपाय म्हणून साथरोग अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटन स्थळावर जाणेसाठी सर्व पर्यटकांना दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश देत आहे असे मा.जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक