पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांचा दौरा



अलिबाग दि.20, राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 21 मार्च, 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता सुतारवाडी, ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धन, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता श्रीवर्धन येथे आगमन व कोरोना विषाणू प्रतिबंधक उपायांविषयी बैठक. दुपारी 12.30 वाजता श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने दिवेआगर ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता दिवेआगर व पर्यटकांसाठी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपयांकरीता हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक. दुपारी 1.30 ते 2.00 राखीव. दुपारी 2.00 वाजता दिवेआगर येथून शासकीय वाहनाने आंबेत, ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता आंबेत, ता.म्हसळा येथे आगमन व आंबेत पुलाच्या कामाबाबत आढावा. सायं. 4.00 वाजता आंबेत येथून शासकीय वाहनाने माणगांवकडे प्रयाण. सायं. 4.45 वाजता माणगांव येथे आगमन व श्री.आनंदशेठ यादव यांच्या उतेखोल येथील निवासस्थानी भेट. सोईनुसार माणगांव येथून शासकीय वाहनाने धाटाव, ता.रोहाकडे प्रयाण. धाटाव येथे आगमन व श्री.विनोद पासलकर, तालुकाध्यक्ष रा.काँ.पा. यांचे निवासस्थानी भेट. सोईनुसार रोहाकडे प्रयाण व राखीव. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी, ता.रोहा येथे आगमन व राखीव.
रविवार दिनांक 22 मार्च, 2020 दिवसभर राखीव (सुतारवाडी, ता.रोहा)
सोमवार दिनांक 23 मार्च, 2020 सकाळी 9.30 वाजता सुतारवाडी, ता.रोहा येथून शासकीय वाहनाने पेणकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता पेण येथे आगमन व राखीव. सोईनुसार पेण येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. मंत्रालय येथे आगमन.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक