पर्यटक जलवाहतूक बंदी आदेश जारी


अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र,खाडी किनारी जलक्रीडा प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प चालविण्यात येतात अशा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रात चालू असलेले जलक्रिडा  प्रकल्प व नौकाविहार प्रकल्प तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मार्वे मनोरी व एक्सेलवर्ड, बोरीवली ते एक्सेलवर्ड, थळ ते खांदेरी किल्ला, किहिम ते खांदेरी किल्ला, दिघी ते जंजिरा किल्ला, मुरुड ते जंजिरा किल्ला, मुरुड ते पद्मदुर्ग (कासा किल्ला),राजपुरी ते जंजिरा किल्ला, मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला, पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या पर्यटन स्थळा दरम्यान होत असलेली पर्यटक जलवाहतूक  31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात यावी.
तसेच जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन सदर ठिकाणची जलप्रवासी वाहतूक सुरळीतपणे  सुरु ठेवण्यात यावी असे डॉ.रामास्वामी एन.मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई  यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक