दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरणस्नेही वाहनावरील दुकानांसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

 

 

             रायगड,दि.22(जिमाका) :-व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ एस.आर.म्हैसकर यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे ही या योजनेची मुख्य उद्देश आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक