राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 

रायगड,दि.22(जिमाका):- नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे.

देशातील AIIMS. IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातीलल विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली असून सन 2023-24 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घट्कांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समानसंधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी 5 हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी 5 हजार असे रुपये 10 हजार दोन टप्यात अदा केले जाणार आहे.

या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह दि दि.4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ पुणे येथे सादर करावा.

पदवी /पदव्युत्तर पदवी/ पदव्युतर पदविका पुर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड सुनील जाधव यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक