औषध विक्रेत्यांच्या प्रस्तावित बंद कालावधीत शासकीय व अन्य रुग्णालयांतून औषधांची उपलब्धता



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.26- अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र औषध विक्रेता संघटनेने  शुक्रवार दि.28 रोजी  एक दिवसासाठी देशव्यापी बंद पुकारला आहे. या प्रस्तावित बंद संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गि.दि. हुकरे यांनी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना आवाहन केले आहे की, आपला व्यवसाय हा रुग्णांच्या जीवनाशी निगडीत असून त्यांनी आपली औषध विक्रीची सेवा अखंड सुरु ठेवावी. तसेच या एक दिवसाच्या कालावधीत तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्धतेची व्यवस्था शासकीय रुग्णालयांतून व अन्य खाजगी रुग्णालयांतून करण्यात आली असल्याचेही श्री. हुकरे यांनी कळविले आहे.
 तसेच या कालावधीत जिल्ह्यातील अनेक औषध विक्री केंद्र सुरु राहणार असून याशिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांत औषधे विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. गरजू रुग्णांना सरकारी, निमसरकारी, सेवाभावी दवाखाने, तसेच नोंदणीकृत रुग्णालये व खाजगी रुग्णालये येथे औषधे उपलब्ध असून या संस्थांनी रुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यंत तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी औषध निरीक्षक -9867727713, कि.मु.राजने- 88706947470 यांच्याशी अथवा सहाय्यक आयुक्त गि.दि. हुकरे यांच्याशी 9867727739 अथवा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02143-254678 येथे अथवा आपल्या क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक