जिल्हा स्तरीय बँक समन्वय समिती बैठक : प्राधान्य क्षेत्राचा पतपुरवठा वाढवा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25- जिल्ह्यातील सर्व बँकानी प्राधान्यक्षेत्राचा पतपुरवठा वाढवून जिल्ह्यात रोजगार स्वयंरोजगार तसेच कृषी या क्षेत्राला बळकटी द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बैठकीस रिजर्व बँकेचे बी.एम.कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुधाकर रघतवान, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा क्षेत्रिय व्यवस्थापक सी.के.वराते, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक आनंद निंबेकर, ग्रामीण प्रधिक्षक केंद्राचे व्ही.डी.कुलकर्णी, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, उपजिल्हाधिकारी रोहयो श्री.मठपती तसेच विविध बँकांचे प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. 
यावेळी प्राधान्य क्षेत्रातील  व शासन अर्थसहाय्यीत उपक्रमांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.  त्यात प्रामुख्याने पिक कर्ज, बचत गटांना द्यावयाचा पतपुरवठा, रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वयंरोजगार योजना आदि योजनांचा व क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित बॅंकांचा शाखानिहाय पिक कर्ज वाटप, रोजगार स्वयंरोजगारासाठी कर्ज वाटप, स्वयंसहाय्यता बचतगटांना कर्ज वाटप याबाबतचा आढावा घेऊन उपस्थितांना सुचना देण्यात आल्या.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक