विभागीय आयुक्तांनी घेतला मतदार नोंदणीचा आढावा



अलिबाग, जि.रायगड दि.26,(जिमाका) – जिल्ह्यातील मतदार नोंदणीसंदर्भात विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीधर बोधे,  प्रांताधिकारी शारदा पोवार, प्रतिमा पुदलवाड, विठ्ठल इनामदार, रविंद्र बोंबले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच सर्व तालुकास्तरीय मतदार नोंदणी अधिकारी  आदी उपस्थित होते.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणीविषयक माहितीचे सादरीकरण केले.  यावेळी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्यात आली.
तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. पाटील म्हणाले की, दिव्यांग मतदार, स्थलांतरीत मतदार, वगळण्यात आलेली नावे याबाबत काटेकोरपणे कारवाई होणे आवश्यक आहे. पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी  प्रत्येक मतदाराचे मतदार यादीत नाव नोंदवून घेण्यासाठी  प्रयत्न करा, त्यासाठी जनजागृतीवर भर द्या, असे निर्देश यावेळी डॉ. पाटील यांनी उपस्थितांना दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक