पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16 2016-2017 तसेच 2017-18 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून शनिवार दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप व अर्हता पुढील प्रमाणे-
राज्यस्तरीय पुरस्कार:- रु.एक लाख एक  रोख, स्मृतीचिन्ह्, शाल व श्रीफळ तसेच  महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर पुरस्कार,दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे ते पुढील 5 वर्ष पुरस्कारासाठी पात्र राहाणार नाहीत.
विभागीय पुरस्कार:- रु. पंचवीस हजार एक रोख स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच  महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलीत मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकाराणापासून अलिप्त असावे.
जिल्हास्तरीय पुरस्कार:- रु.दहा हजार एक, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच  महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय दलीत मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे  त्या महिलांना हा पुरस्कार अनुज्ञेय राहाणार नाहीत.
पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्र:- राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार- 1.)  प्रस्ताव धारकांची माहिती केलेल्या कार्याचा तपशिल. 2.)  वृत्तपत्र फोटोग्राफ्स् इ., 3.)  सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे. 4.)  यापूर्वी पुरस्कार मिळाले  असल्यास तपशिल
विभागीय स्तर पुरस्कार:- 1.)  संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल., 2.)  वृत्तपत्र कात्रणे 3.,)   संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय ? असल्यास तपशिल 4.)   संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.
तरी वरील प्रमाणे अहर्ता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती, संस्थांनी अर्हतेशी संबंधित आवश्य्क कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावे. इच्छुक व्यक्ती, संस्थानी विहीत नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड-अलिबाग, श्रीबाग नं.2 डॉ. वाजे हॉस्पीटल जवळ फोन नं.02141-225321 या कार्यालयाशी संपर्क साधावा. पुरस्कारासाठी प्राप्त् झालेल्या अर्जामधून निवड समितीकडून ज्या समाजसेविका, संस्था निवड होईल त्यांना पुढील तीन प्रमाणपत्रे 1.) उपविभागीय  अधिकारी यांचे विनादुराचार प्रमाणपत्र., 2.)  गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र. 3.)   सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणत्र सादर करणे बंधनकारक राहील. तरी इच्छुक व्यक्तींनी, संस्थांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करण्याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक