अनधिकृत गैरहजर शिक्षकास जि.प्र.प्रशासनाची नोटीस



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25- रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा निजामपूर ता.महाड या प्राथमिक शाळेवरील मु.पो.जुनी ता.बिलोली जि.नांदेड येथील मूळ रहिवाशी असलेले प्राथमिक शिक्षक श्री.दयानंद मल्लप्पा हे 18 ऑगस्ट 2002 पासून अनधिकृत गैरहजर आहेत. त्यांनी त्यांच्या गैरहजेरीचा खुलासा येत्या दहा दिवसाच्या आत करावा, अन्यथा त्यांची सेवा संपुष्टात येईल, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी बजावली आहे.
 या अनधिकृत गैरहजेरीबाबत त्यांना दि.9 एप्रिल 2010, दि.17 एप्रिल 2010, 12 जानेवारी 2015, 18 एप्रिल 2018 या तारखांना त्यांच्या मुळ गावी म्हणजेच मु.पो. जुनी , ता. बिलोली जि. नांदेड येथे नोटीसा देण्यात आलेल्या आहेत.  श्री.मल्लपा यांनी वृत्त प्रकाशीत झालेल्या तारखेपासून गैरहजेरीचा खुलासा दहा दिवसाचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या कार्यालयात स्वत: हजर राहून सादर करावा.  अन्यथा आपणास सेवेची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन आपली सेवा संपुष्टात आणण्यात येईल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 च्या नियम 47 (1) च्या तरतुदीनुसार सेवेत खंड पडून मागील सेवेचा हक्क संपुष्टात येईल व परिणामी आपणास सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार नाही व एकदा सेवा संपुष्टात आणल्यानंतर आपणास कोणत्याही प्राधिकाऱ्यांकडे तसेच न्यायालयात दाद मागता येणार नाही असे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक