“राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा” निमित्त रॅली, जिंगल्स व रोल प्ले स्पर्धा संपन्न

 


         

अलिबाग,दि.6(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व जेएसएम कॉलेज,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  जेएसएम कॉलेज,अलिबाग  येथे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त रॅली , जिंगल्स व रोल प्ले स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

 यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने, जिल्हा सहाय्यक लेखा श्री. रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्री सचिन जाधव,  मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे क्लिनर श्री.रुपेश पाटील, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकवाड, डॉ.सुनील आनंद व स्वयंसेवक उपस्थित होते. 

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी जिंगल्स व रोल प्ले स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी जेएसएम कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.निळकंठ शेरे यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांनी एचआयव्ही/एड्स, एचआयव्ही कशामुळे होतो, एचआयव्हीबाबत समज-गैरसमज, तो होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी, याबाबत माहिती दिली. तसेच एचआयव्ही हा संसर्गजन्य आजार नसल्याचे सांगून एचआयव्ही होण्याची 1)एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला, 2)एचआयव्ही संसर्गित रक्त दिले गेल्यास, 3)असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास, 4) ड्रग घेताना एचआयव्हीबाधित सुईचा वापर झाल्यास या प्रमुख चार कारणांविषयीची माहिती दिली.  

         एचआयव्ही/एड्स-ॲक्ट 2017  हा कायदा दि.10 सप्टेंबर 2018 रोजी  एचआयव्ही/एड्सचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, एचआयव्ही/एड्सची लागण झालेल्या आणि संसर्गित व्यक्तींच्या कायदेशीर आणि मानवी हक्कांना बळकट करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला असून एचआयव्ही एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 2017 एचआयव्ही बाधित लोकांबरोबर भेदभाव होवू नये, म्हणून हा कायदा बनविण्यात आला असल्याचे सांगितले.

      जेएसएम कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.निळकंठ शेरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तरूण पिढीने समाजात वावरताना सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याबाबत आवाहन केले. जास्तीत जास्त एचआयव्हीचा संसर्ग हा तरूण पिढीला होत असल्यामुळे त्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे तसेच एचआयव्हीबाबत व्यवस्थित माहिती घेऊन तो होऊ नये म्हणून समाजामध्ये प्रबोधन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून देशाचे भविष्य हे तरुण पिढीच्या हातात असल्याने तरुण पिढीने व्यसनाधीनतेपासून दूर राहायला हवे व एचआयव्ही/एड्स विषयी शास्त्रीय माहिती घेऊन समाजाचे रक्षण करायला हवे, असेही  त्यांनी सांगितले.

      या कार्यक्रमाच्या वेळी जेएसएम कॉलेजमधील एन.एस.एस.विद्यार्थ्यांच्या गटांनी जिंगल्स व रोल प्ले स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. त्यामधील प्रेरणा या गटाचा प्रथम क्रमांक आला असून त्यास रक्कम रुपये 2 हजार 500/- चे , निष्ठावंत या गटाचा द्वितीय क्रमांक आला असून त्यास रक्कम रुपये 1 हजार 500/- चे रोख पारितोषिक तर कौशल्य या गटाचा तृतीय  क्रमांक आला असून त्यास रक्कम रुपये 1 हजारचे रोख पारितोषिक जेएसएम कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.निळकंठ शेरे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग श्री. संजय माने यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद यांनी विशेष परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड