कर्करोग जनजागृतीकरिता जिल्हा नियोजन भवन येथे माहितीपर व्याख्यान संपन्न

 


अलिबाग,दि.6(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे कर्करोगासंदर्भात माहितीपर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 निमित्ताने,जागतिक आरोग्य संस्थेने जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी जागतिक मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेचा उद्देश तंबाखूच्या पर्यावरणीय परिणामाबद्दल जागरुकता वाढविणे,हा असून त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये कॅन्सर आजाराविषयी जागृकता वाढविण्यासाठी डॉ.शर्मिला पिंपळे, M.D. Professor and Physician Department of Preventive Oncology Center for Cancer Epidemiology (CCE) टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर कर्करोग प्रतिबंध केंद्र- खोपोलीच्या प्रमुख डॉ.प्रतिभा पाटील यांनी स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग याविषयी तसेच डॉ.प्रहतीस यांनी तोंडाचा कर्करोग या विषयाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंध विभाग हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद रुग्णालय येथे मागील वर्षी दि.14 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्यात आलेला आहे. या विभागांतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.  या उपक्रमांतर्गत तंबाखू दुष्परिणामांच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू पर्यावरणास धोका' या संकल्पनेवर आधारित हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्नेहल डी. के. व मेडिकल सोशल वर्कर श्री.दिनेश मुसळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक