जिल्ह्यातील तिन्ही दलांमधून निवृत्त माजी सैनिकांसाठी रोजगार सेमिनार पात्र माजी सैनिकांनी संधीचा लाभ घ्यावा

 

अलिबाग,दि.7 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील तिन्ही दलांमधून निवृत्त माजी सैनिकांसाठी रोजगार सेमिनार बुधवार, दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. सेलर्स इन्स्टीटयूट (सागर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये 1 हजार ते 1 हजार 200 माजी सैनिक तसेच 30 ते 40 कार्पोरेट कंपनीचे  व पब्लिक सेक्टर कंपनीचे प्रतिनिधी यांच्या साठीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

माजी सैनिकांना सैन्य निवृत्ती पश्चात पुन:श्च रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सेमिनारचे उध्दीष्ट आहे.  सेमिनारमध्ये माजी सैनिकांना त्यांच्या योग्यतेनुसार विविध कंपनीच्या प्रतिनिधींसोबत रोजगाराकरिता परस्पर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.  सेमिनारकरिता ऑनलाईन रजिस्ट़ेशन डिजीआर वेबसाईट http://www.dgrindia.com वर उपलब्ध आहे. माजी सैनिकांनी आपले माजी सैनिक ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, वैयक्तिक तपशिल (CV)  यांच्या पाच प्रतिसोबत हजर रहावे.

            जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, श्री.गोविंदराव मारुती साळूंखे यांनी केले आहे.  

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड