जिल्ह्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक, मालकांनी विहित मुदतीत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करुन घ्यावे --उप प्रादेशिक परिहवन अधिकारी,महेश देवकाते

 

 

अलिबाग,दि.7 (जिमाका):-मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या निर्णयान्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दि. 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निर्देश दिले. या भाडेवाढीच्या अनुषंगाने भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता दि.30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा परिचलन पद्धतीने दि.15 जानेवारी 2023 पर्यंत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली होती.

 टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या वाहनांचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता दि.31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव परिचलन पद्धतीने सविनय सादर करण्यात आली. त्यानुषंगाने बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या वाहनांच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरीता दि.31 मार्च 2023 पर्यंत शेवटची मुदतवाढ देण्याचा तसेच भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टेरिफ कार्ड दि.31 मार्च 2023 पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याकरिता प्राधिकरणाने परिचलन पद्धतीने मान्यता दिली आहे.

दि.16जानेवारी 2023 ते दि.03 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भाडेमीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या ऑटोरिक्षा व टॅक्सींना दंड लागू राहील. दि.04 फेब्रुवारी 2023 ते दि.31 मार्च 2023 या कालावधीत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन न केलेल्या ऑटोरिक्षा व टॅक्सींना दंड लागू राहणार नाही.

तसेच विहित मुदतीत भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन न केल्यास संबंधित ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक, मालकास प्राधिकरणाच्या दि.20 डिसेंबर 2021 रोजीच्या बैठकीतील निर्णय क्रमांक 22/2021 नुसार मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाचे विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन मात्र किमान सात दिवस जास्तीत जास्त 90 दिवस किंवा मुदत समाप्तीनंतर प्रतिदिन रु. 50/- मात्र जास्तीत जास्त रु. 5 हजार विभागीय दंडात्मक शुल्क आकारण्याचा निर्णय दि.01 एप्रिल 2023 पासून लागू होईल, असे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी, पेण महेश देवकाते यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड