जिल्ह्यात दि.11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


 

अलिबाग,दि.8(जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री.अमोल अ. शिंदे यांनी कळविले आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 9 हजार 797 इतकी प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तसेच इतर वादपूर्व प्रकरणे अशी 37 हजार 149 वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

त्यामुळे दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती एस.एस. सावंत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक