*अनोंदणीकृत उद्योजकांसाठी महास्वयंम् वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवरची सुविधा*


अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम् वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे अधिसूचित करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम् या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर नावाची नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

      अनोंदणीकृत उद्योजकांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर  या मेनूवर क्लिक करुन  पेजवर कंपनीची माहिती भरावी. भरलेल्या माहितीच्या आधारे मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करावा. ३० मिनिटात उद्योजकाच्या ई-मेल वर उमेदवारांच्या यादीची लिंक प्राप्त होईल. त्या लिंकद्वारे उद्योजकांस उमेदवारांची यादी प्राप्त  होईल. महास्वयंम् वेबपोर्टलवर सर्व सुविधा उद्योजकांसाठी मोफत आहे.  या सुविधेच्या अधिक  माहितीसाठी अथवा काही अडचण असल्यास ०२१४२-२२२०२९ या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग रायगड चे सहायक आयुक्त शा. गि. पवार  यांनी केले आहे.  

००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक