पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


            अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज, महिला व युवक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल /अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दि.21 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 10.00  ते सायंकाळी 06.00  या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.  जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता  विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच ज्यांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  https://www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर  Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्ल‍िक करुन सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्ल‍िक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्ल‍िक करुन दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपला जिल्हा निवडून Action-view details  मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लीक करावे त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो.

रिक्त पदांकरिता Apply वर क्ल‍िक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता संपर्क साधणे शक्य होते, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा. गि. पवार  यांनी केले  आहे. तसेच वेबपोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असेल तर या कार्यालयाच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक