पेण येथे जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

 

 

रायगड,दि.3(जिमाका):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने नगरपालिका सभागृह, पेण 3 रा मजला येथे (शनिवार, दि.30 सप्टेंबर) रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, पेण बार वकील संघटना अध्यक्ष अॅड.बी.व्ही.म्हात्रे, जेष्ठ वकिल अॅड. काटकर, अॅड.तेजस्विनी नेने, पेण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  रामदास पाटील,  कार्यालय अधिक्षक श्रीमती माधुरी पाटील,  गृहपाल संदिप कदम, कनिष्ठ लिपिक श्रीमती राजेश्री म्हात्रे तसेच पेण मधील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण सुनिल जाधव यांनी सामाजिक न्याय विभाग व शासनामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, आरोग्य शिबीर, कायदे, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन या विषयी मार्गदर्शन केले.

तसेच ॲड.बी.व्ही.म्हात्रे, अॅड. काटकर यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांसाठी कायद्यातील तरतूदी याविषयी माहिती दिली. पेण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्या व जेष्ठ नागरिक संघामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली.

पेण तालुक्यात जेष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रम चालविणाऱ्या अहिल्या मंडाळाच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी गाडगीळ व व्यवस्थापिका श्रीमती जोशी यांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूचसंचालन व आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक