जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देणार --महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यस्तरीय पोषण माह सांगता सोहळा मंत्री श्रीमती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न पोषण आहार प्रदर्शन, पारितोषिकांचे वितरण, विविध कार्यक्रमांनी उपक्रमाची सांगता


 

रायगड,दि.06 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देण्याचा प्रयत्न असून यासाठी जिल्ह्यात होणारे काम राज्यासाठी मॉडेल ठरणार आहे. सध्या भाड्याच्या जागेत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या इमारतीत जाता यावे यासाठी बांधकामासाठी सध्या असलेल्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करण्यात येईल ज्यामुळे तेथे असणारा हॉल तसेच पोषण आहारासाठी चे किचन व स्वच्छतागृह यासह अंगणवाडी केंद्र सुसज्ज असेल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

 

राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त विजय क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त अनंत खंडागळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)  श्रीम.निर्मला कुचिक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विनीत म्हात्रे, नागरी बालसेवक विकास प्रकल्पचे सुनील ओव्हाळ आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या राज्यात 17000 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भरती करून नियुक्तीपत्र दिले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या आरोग्याची काळजी देखील विभाग घेत असून यासाठी डॉ आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांची आरोग्य तपासणी केली आहे. दिवाळीनिमित्त दिली जाणारी भाऊबीज देखील वेळेपूर्वी दिली जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या जिल्ह्यातील कर्जत सुधागड या तालुक्यांमध्ये असलेल्या कुपोषित बालकांच्या काळजीसाठी लक्ष दिले जात आहे. अंगणवाडी केंद्रातून नवरात्रीच्या कालावधीत देखील नवरंग पोषणाचे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस चांगले काम करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्तेवाड यांनी केले. ते म्हणाले जिल्ह्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी चांगली केली जात आहे . पोषण आहार सप्ताह विविध उपक्रम व कार्यक्रमांनी केला गेला आहे. जिल्ह्यातील मॉडेल अंगणवाडी केंद्राच्या तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. महिला व बालकल्याण उपायुक्त विजय क्षीरसागर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सुरुवातीस दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . पोषण माह सप्ताह व महिला बाल कल्याण विभागाच्या जिल्ह्यातील उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत चित्रफित प्रदर्शित करण्यात आले. इरशाळगड आपातग्रस्त मदतीसाठी मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या हस्ते  रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत निधीत जमा करण्यासाठी १७ लाख ७४ हजार रुपयांचे धनादेश  जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री शिंदे यांना सपुर्द करण्यात आले.  सदर निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस प्रसंगी इरशाळगड येथील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने  उभारण्यात आला आहे.

 

पोषण आहार महिन्याच्या कालावधीत जनजागृती साठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी  बसविलेल्या पथनाट्य व पोवाड्याचे यावेळी सादरीकरण केले.  तसेच अंगणवाडीतील केंद्रातील बालिकांनी सादर केलेल्या "आली तारा" या स्वगत व गाण्याचे कौतुक करत त्यांनी सदर बालिकांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले.

 

कार्यक्रमापूर्वी महिला व बालविकास मंत्री श्रीमती तटकरे यांच्या स्वागतासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्य पहिले व स्वतः लेझीम हाती घेत लेझीम खेळून त्यांच्यात सहभागी झाल्या. त्यांनी जिल्ह्यातील विविध बचत गटांनी उभारलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन करून तेथील साहित्य, पदार्थ व वस्तूंबाबत माहिती  घेतली . विविध तालुका निहाय अंगणवाडी सेविका च्या वतीने  स्टॉलला भेट देऊन पोषण आहारासाठी तयार केल्या जाणाऱ्या पौष्टिक पदार्थाच्या पाहणी केली.

0000

पुरस्कार मिळालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे:

आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार :- हर्षदा हिरामण दोरे (कासू, ता.पेण),उल्का उमेश कुलकर्णी (रामराज,ता. अलिबाग),पुजा संजय चांगोले (गव्हाण, ता. पनवेल).

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार :-कल्पना बाबु भोपी, कर्जत २,कल्पना नथू वरे (कोंढावे, कर्जत1),  राधिका रामचंद्र ऐनकर (खांडस, कर्जत 2), रंजना संजय संसारे (विन्हेरे, महाड), वृषाली लिडकर (बागमांडला, श्रीवर्धन), भारती नामदेव गावंड (आवरे, उरण), विमल सखाराम जगदाळे (कापडे बु. पोलादपूर), मनिषा प्रितम ठाकूर ( नविवाडी शिघ्रे, मुरुड), ज्योती हरिश्चंद्र डंगर (हमरापूर, पेण), वृंदा विजेंद्र जुमलेदार (कल्हे, पनवेल), शिवानी विश्वजीत घरत (परहूरपाडा, अलिबाग), दिलनवाज मकबूल कवारे (मेंदडी, म्हसळा), मुग्धा महेश जवके (करंजाई, सुधागड), आशा संतोष देशमुख (साजगाव, खालापूर), आरती अविनाश वादळ (मांदाड, तळा), माधवी मोरेश्वर भगत (आंबेवाडी, रोहा), नेहा नितीन शिर्के (भूषण आ.वाडी, माणगाव)

आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार :-सरेखा रामचंद्र गुडे (जामरुंग, कर्जत 1), कल्पना बाबू भोपी (नेरळवाडा, कर्जत 2), प्रियंका पांडुरंग शिरशिवकर (बिरवाडी, महाड), सुरेखा सुरेश नक्ती (वडवली मोहल्ला, श्रीवर्धन), करुणा निवृत्ती पाटील (कोप्रोली, उरण), शुभांगी सुभाष कासार (चरई, पोलादपूर), सारीका स्वप्नील लाड (आगरदांडा, मुरुड), मिनाक्षी जगदीश ठाकूर (दादर मधली आळी, पेण), सुविधा सुहास पाटील (उल्वा, पनवेल), संपदा संतोष शिंदे (सासवणे कोळीवाडा, अलिबाग), रुपाली रुपेश आंजर्लेकर (खारगाव बु., म्हसळा), भार्गवी भारत पोंगडे (अडूळसे, सुधागड), लता नंदकुमार खराळ (वासांबे, खालापूर), समिधा सहदेव साळुंखे (बेलघर, तळा), सुवर्णा सखाराम कदम (कुडली, रोहा), संध्या नामदेव जाधव (तळाशेत, माणगाव).

पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेले प्रकल्प :- प्रकल्पाचे नाव- पनवेल 1, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रविण अधिकराव पाटील, प्रकल्पाचे नाव- माणगाव, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बी. बागल, प्रकल्पाचे नाव- उरण, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम.स्नेहा नितीन चव्हाण, प्रकल्पाचे नाव- पोलादपूर, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. माधुरी गोविंद फड, प्रकल्पाचे नाव- पेण, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. प्रविण अधिकराव पाटील, प्रकल्पाचे नाव- पनवेल नागरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. सुहीता ओव्हाळ.

बिटस्तरावर 100 टक्के मोबाईल व्हेरिफिकेशन पुरस्कार (पर्यवेक्षिका) :- रत्नप्रभा बाळकृष्ण म्हात्रे (माणगाव), सीमा गिरीधर ठाकूर (माणगाव), सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर), माधूरी गोविंद फड (पोलादपूर), गिता निवृत्ती उतेकर (पोलादपूर), कल्पिता संतोष साळावकर (अलिबाग), श्वेताली रामेश्लवर यादव (महाड), स्नेहा नितिन चव्हाण (उरण)

अर्थसाहाय्य योजना (अनाथ बालक ) सुयश राकेश मेथा   5 लाख   (फिक्स डिपॉझिट), टिना राकेश मेथा  5 लाख   ( फिक्स डिपॉझिट)

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड