शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भातील आक्षेप अथवा हरकती असल्यास सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.13 (जिमाका) :-शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार”, “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)”, असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.14 डिसेंबर 2022 शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावरील पुरस्कार (Award) टॅब मध्ये दि.13 ते दि.15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे.

प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि.13 ते दि.15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in, या ई-मेल आयडीवर विहित नमुन्यात कळविण्यात याव्यात, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. विहित नमूना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या (Latest News) मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या आक्षेप/हरकतींचे निराकरण, स्पष्टीकरण दि.15 ते दि.17 एप्रिल 2023 या कालावधीत संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावरील पुरस्कार (Award) टॅब मध्ये प्रसिध्द करण्यात येईल.  संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असून तो अंतिम नाही, असेही क्रीडा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक