सागरी इतिहासाच्या पुनरुत्थानाला प्रोत्साहन देणे हा “सॅम नो वरुण” रॅलीचा उद्देश ---रघुजीराजे आंग्रे

 

 

            अलिबाग,दि.11 (जिमाका):- दीपगृहे, ऐतिहासिक गावे, समुद्रकिनारे इत्यादींवर लक्ष केंद्रित करून, भारतीय नौदलाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सागरी वारसाबद्दल जागरुकता वाढविणे आणि सागरी इतिहासाच्या पुनरुत्थानाला प्रोत्साहन देणे हे  सॅम नो वरुण: रॅलीचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी भारतीय नौदलाच्या सॅम नो वरुण: रॅलीच्या सदस्यांच्या स्वागत प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.

  यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार (नि.) गोविंद राव साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

 रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले, भारतीय नौदलावर भारत देशाच्या सागरी भागांचे संरक्षण आणि रक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पेलत असताना देशाच्या सागरी हितसंबंधांना उत्तेजन देण्यासाठी आणि सागरी चेतनेला प्रोत्साहन देण्यासाठी नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन (NWWA) या संस्थेने आयोजित केलेली समुद्रकिनाऱ्यांजवळून सॅम नो वरुण: या मोटार कार  रॅलीचे आयोजन कौतुकास्पद आहे. विशेष करून या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या जवानांमध्ये महिला अधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे रॅलीचे सारथ्य शशी त्रिपाठी या महिला करीत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

             भारतीय नौदलाच्या सॅम नो वरुण: या रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या श्रीमती शशी त्रिपाठी म्हणाल्या की, भारत देशाच्या सागरी भागांचे संरक्षण आणि रक्षण करण्याची मोठी जबाबदारी नौदलावर आहे. देशाच्या सागरी हितसंबंधांना उत्तेजन देण्यासाठी आणि सागरी चेतनेला प्रोत्साहन देण्यासाठी नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन (NWWA) या संस्थेतर्फे समुद्रकिनाऱ्यांजवळून सॅम नो वरुण: या मोटार कार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात कोलकाता येथून 26 मार्च 2023 रोजी INS नेताजी सुभाष” येथून रॅलीला झेंडा दाखविण्यात आला.  दि. 19 एप्रिल 2023 रोजी लखपत गुजरात येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. ही रॅली संपूर्ण 7 हजार 500 किलोमीटर किनारपट्टीलगतच्या परिसरातून जाणार आहे.

या रॅलीच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव, तरुणांसाठी भारतीय नौदलातील करिअरच्या असंख्य संधी, जागरुकता मोहीम, विशेषत: अग्निपथ योजना तसेच नौदलासाठी महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी सेवारत महिला अधिकारी आणि नौदल पत्नींच्या सहभागाने नारी शक्ती प्रदर्शित करणे, तरुण पिढीमध्ये साहसाची भावना निर्माण करून त्यांना भारतीय नौदलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे, रॅलीच्या मार्गातील नौदल दिग्गज आणि वीर नारी यांच्याशी संवाद साधणे, विविध बंदरे, किल्ले, दीपगृहे, ऐतिहासिक गावे, समुद्रकिनारे इत्यादींवर लक्ष केंद्रित करून, भारतीय नौदलाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सागरी वारसाबद्दल जागरुकता वाढविणे आणि सागरी इतिहासाच्या पुनरुत्थानाला प्रोत्साहन देणे, याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी रॅली मधील सहभागींचे जिल्हा प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड