इयत्ता 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वदेस फाऊंडेशन तर्फे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची संधी

 

अलिबाग,दि.11 (जिमाका) :- इयत्ता 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या रायगड  जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, सुधागड (पाली) या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वदेश  फाऊंडेशन तर्फे उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे : 12 वी मध्ये किमान 60 टक्के मार्क, उत्पन्न 8 लाख 50 हजारच्या आत असले पाहिजे. 

यासाठी मिळणारा लाभ- वार्षिक उत्पन्न, कॉलेज फी व वसतिगृह यांच्यानुसार 25, 40, 50, 60 आणि 75 टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेत, दोन हप्त्यात जमा होईल.

जिल्ह्यातील 12 वी च्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  दि.15 एप्रिल 2023 पर्यंत

https://swadesmis.surveycto.com/collect/stage1excellence_scholarship_application_fy_2324?caseid=

 या लिंकचा वापर करून फॉर्म भरावा.

अधिक माहितीसाठी स्वदेस फाऊंडेशनच्या बाळासाहेब माने 9922495033 किंवा विनोद पाटील 8379966767 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वदेश फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले आहे.

00000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड