पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 16 रोजी वाहनांचा लिलाव



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण जि. रायगड वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव गळवार दि.16 जुलै रोजी दुपारी तीन ते चार या वेळेत   उप प्रादेशिक  परिवहन कार्यालय याचे तपासणी पथ (Test Track) जिते ता.पेण  जि. रायगड या ठिकाणी करण्यात येणार आहे,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये  नोंदणी प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्त्‌दात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे. वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
वाहनांच्या मालकांनी,ताबेदारांना ,वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि.12 जुलै पर्यंत लेख हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांच्या लिलाव मंगळवार दि.16 जुलै रोजी दुपारी तीन ते चार या वेळेत   उप प्रादेशिक  परिवहन कार्यालय याचे तपासणी पथ (Test Track) जिते ता.पेण  जि. रायगड या ठिकाणी करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तद्नंतर वाहन मालकाची कोणतीही तक्रार, दावा यांची दखल घेतली जाणार नाही. सदर वाहने सोडवून नेण्याची ही अंतिम संधी असेल.
जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी दि.11,12 व 15 जुलै 2019 रोजी सकाळी  अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळता)  रु.25000/- रक्कमेचा DY.RTO PENया नावे अनामत रक्कमेचा सीटीएस मानांकाप्रमाणे डिमांड ड्राफ्ट नाव नोंदणी करुन या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. सदरची वाहने जशी आहे तशी या तत्वावर  जाहीर लिलावाद्वारे विकली जातील.
जाहीर लिलाव करावयाच्या वाहनांचे ठिकाण, लिलावाच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दि.11 जुलै पासून प्रदर्शित  करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड  यांनी स्वताकडे राखून ठेवले आहेत.असे आवाहन कराधिन प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि.रायगड  यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक