जिल्ह्यातील पाणी प्रकल्प सुरक्षित असल्याचे यंत्रणांचे अहवाल



      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8-  रायगड जिल्ह्यातील विविध  प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. यासंदर्भात संबंधित प्रकल्पांची पाहणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,  कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड,  जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या यंत्रणांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले असून जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे.
याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार,जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प असून  त्यांच्यावर आधारीत 49 लघु पाटबंधारे योजना व 36 पाझर तलाव आहेत. कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या उमटे पाणी साठवण तलावाचा बंधारा सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.  सध्या या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.  धरणाची मुख्य माती भिंत व पाणी सांडवा, ट्रेंच गॅलरी सुस्थितीत आहे. या धरणाच्या सांडवा भिंतीचे व खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीत किरकोळ दगड निघाले असले तरी  धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे.
मृदा व जलसंधारण विभागाकडील दहा तलावांच्या पाहणीचा अहवालही प्राप्त झाला आहे.  त्यात साई साठवण तलाव ता. माणगाव,  तळा तळेगाव, ता. तळा, पहूर ता. रोहा,  देवळे ता. पोलादपूर, खरसई ता. म्हसळा,  नांदळा ता. महाड, पाषाणे ता. कर्जत,  विन्हेरे ता. महाड,  रातवड साठवण तलाव ता. माणगाव,  रातवड मेंढाण साठवण तलाव ता. माणगाव या प्रकलपांचा समावेश असून सर्व धरण सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद आहे.  रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे योजनांचे तलाव सुस्थितीत असल्याचे अहवालात म्हटले आहे.  त्यात रानवली ल.पा. योजना ता. श्रीवर्धन, पाभरे ल.पा. योजना ता. म्हसळा, कार्ले ल.पा. योजना ता. श्रीवर्धन,  कवेळे ल.पा. योजना ता. सुधागड, उन्हेरे ल.पा. योजना ता. सुधागड, ढोकशेत  ल.पा. योजना ता.सुधागड, घोटवडे ल.पा. योजना ता. सुधागड, कोंडगाव ल.पा. योजना ता. सुधागड,  वरंध ल.पा. योजना ता.महाड, कोथुर्डे ल.पा. योजना ता. महाड, खिंडवाडी ल.पा. योजना ता. महाड,  खैर ल.पा. योजना ता. महाड, फणसाड ल.पा. योजना ता. मुरुड, श्रीगाव ल.पा. योजना ता.अलिबाग, भिलवले ल.पा. योजना ता. खालापूर,  कलोते- मोकाशी ल.पा. योजना ता. खालापूर,  डोणवत ल.पा. योजना ता. खालापूर,  साळोख ल.पा. योजना ता.कर्जत, अवसरे ल.पा. योजना ता. कर्जत यांचा समावेश असून ही सर्व धरणे सुरस्थितीत असल्याचे नमूद केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड