अनु.जाती, नव बौद्ध स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर, रोटा व्हेटर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8-  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 1.5 अन नॉप ट्रीपींग ट्रेलर,0.8 मी रोटा व्हेंटर  यांचा पुरवठा करण्यात येतो. सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरीता इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत,असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी कळविले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सदर प्रस्ताव सादर करणारे बचत  गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनु.जाती व नवबौद्ध  घटकांतील असावेत,बचत गट अधिकृत मंडळाकडून रजिस्टर असावे,बचत गटाच्या नावे बँकेत पासबुक असावे, बचत गटातील सदस्यांचे जातीचा दाखला,रहिवासी दाखला,शाळेचा दाखला, रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र इत्यादी  आवश्यक कागदपत्र असावीत,बचत गटाची निवड झाल्यास 10 टक्के रक्कम स्वहिस्सा (35000/-) भरावी लागेल.तद्नंतरच शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. या सर्व अटींचा पुर्तता करुन परिपूर्ण विहित नमून्यातील अर्ज सोमवार दि. 22 जुलै 2019 रोजी पर्यंत सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंधळपाडा, रायगड अलिबाग या पत्त्यावर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक