सखी केंद्र ठरले पिडीत महिलांसाठी आधारवड



      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-  रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथी महिला व बालविकास विभागाचे सखी केंद्र हे पिडीत, संकटग्रस्त महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे.
महिला व बाल विकास विभागातर्फे सखी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.  (One Stop Centre) म्हणून  पिडीत, अत्याचारग्रस्त, संकटग्रस्त  महिलांना सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली मिळावी  यासाठी  ही सखी केंद्र सुरु करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही हे केंद्र सुरु आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालयाअंतर्गत हे केंद्र आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,  या केंद्रामार्फत  मोफत निवास , वैद्यकीय सेवा, कायदेशीर सेवा, समुपदेशन,  संकटकाळात प्रतिसाद व संकटमुक्ती सेवा,  गुन्हा दाखल करण्यासाठी  किंवा कौटूंबिक अत्याचाराचा अहवाल तयार करण्यासाठी पोलीस सहाय्य,  अन्य शासकीय विभागांची मदत,  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा इ. सर्व सेवा मोफत पुरविल्या जातात.
जुन 2017 मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले.  तेव्हा पासून आतापर्यंत 986 प्रकरणे केंद्राकडे नोंद झाले. त्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या 866 प्रकरणांमध्ये पती पत्नीत समुपदेशनाद्वारे तडजोड घडवून त्यांचे संसार पुन्हा सुरळीत केले आहेत.
या केंद्राकडे येणाऱ्या पिडीत महिलेला  चार ते पाच दिवस मोफत निवास सुविधा दिली जाते. सॅनिटरी किट,  जेवण व कपड्यांची व्यवस्था केली जाते. तिच्या निवास भोजनाची अन्यत्र कोठेही सोय होत नसेल तर तिची सोय शासकीय महिला वसतीगृहात करुन तिचे पुनर्वसन केले जाते. आता पर्यंत सहा पिडीतांची व चार बालकांची शासकीय महिला वसतीगृहात व बालगृहात निवास सुविधा देण्यात आली आहे.  सखी केंद्रामार्फत 12 महिलांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ देण्यात आला आहे.तसेच या केंद्रामार्फत 21 पिडीत महिलांना मनोधैर्य योजनेचा लाभ मंजूर करुन दिला आहे. तसेच पालक नसलेल्या अथवा एक पालकत्व असलेल्या 11 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.  तसेच पिडीत महिलांचे पुनर्वसन करतांना त्यांना विविध शासकीय योजनांचाही लाभ मिळवून देत सखी केंद्र निराधार पिडीत महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक