सहकारी संस्थांना लेखापरिक्षण बंधनकारक



    
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8-  सर्व सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(1)मधील तरतूदीनुसार वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून (31 मार्च पासून ) चार महिन्यांच्या मुदतीत (म्हणजे 31 जुलै पर्यंत) संस्थेचे लेखापरिक्षण पूर्ण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सूद्धा बंधनकारक आहे,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश शेरे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक  उमेश तुपे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  कलम 79(1अ) मधील तरतूदीनुसार दिनांक 30 सप्टेंबर पूर्वी कलम 79(1अ) च्या (क) ते (च) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वार्षिक अहवाल आर्थिकपत्रके इत्यादी विवरणपत्रे निबंधकास ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.  कलम 79 (1ब) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत सन-2019-20 या वर्षासाठी संस्थेचे लेखापरिक्षक करुन घेण्यासाठी लेखापरिक्षकाच्या नामतालीकेतून लेखापरिक्षकाची नेमणूक  करणेबाबत ठराव घेवून नियुक्ती करणे बंधनकारक आहे. 
वैधानिकदृष्टया बंधनकारक असलेली कार्यवाही न करणाऱ्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळास व जबाबदार अधिकाऱ्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. विहीत मुदतीत लेखापरिक्षण पूर्ण न केल्यास लेखापरिक्षकांची नावे नामतालीकेवरुन कमी करण्याची कार्यवाही होऊ शकते.
सर्व सहकारी संस्थांनी नोंद घेवून गांभिर्याने कार्यवाही करावी असे आवाहन,  जिल्हा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश शेरे, व जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश तुपे यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक