वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पोर्टलवर अर्ज पाठवावे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11-  व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.यासंदर्भात सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेली माहिती अशी की, कमर्शियल पायलट लायसन्स कार्सकरिता शिष्यवृत्ती हि योजना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत राबविण्यात येत होती. तथापि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनान्वये अनु. जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता 1 एप्रिल, 2018  पासून  भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गंत कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स हा अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. सदरील (CPL) कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स ही योजना केंद्र शासनाच्या Top Class Education Scheme (SC) या योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी  थेट केंद्रशासनाकडे  नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलव्दारे सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक