रिजर्व बॅंकेचा उपक्रमःआर्थिक साक्षरता मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12-  भारतीय रिजर्व बॅंकेच्या आर्थिक सहभागीता आणि विकास उपक्रमांतर्गत आज अलिबाग येथे क्षेत्रिय आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यास रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील महिला बचत गट संचालिका, शेतकरी गटांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
            अलिबाग शहरातील आदर्श भवन येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिजर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर आर. के. महाना, रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, नाबार्डचे सुधाकर रघतवान,  लीड बॅंकेचे व्यवस्थापक आनंद निंबकर, ग्रामिण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे( आरसेटी) विजय कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील विविध बॅंकांचे शाखा व्यवस्थापक, तसेच सेवा केंद्र संचालक आदी उपस्थित होते.
यावेळी महाना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बोलतांना महाना यांनी उपस्थितांना  आर्थिक साक्षरता आणि  बॅंकांशी निगडीत आर्थिक व्यवहारांची आवश्यकता सांगितली. बॅंकांद्वारे केले जाणारे आर्थिक व्यवहार हे आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी आर्थिक व्यवहारांबाबत बाळगावयाच्या खबरदारीबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी नाबार्डचे रघतवान यांनी महिला बचतगट आनि त्यांच्या बॅंकिंग व्यवहार व   व्यवसाय विस्तार याबाबत मार्गदर्शन केले. विजय कुलकर्णि यांनी ग्रामिण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुविधा याबाबत माहिती देऊन स्वयंरोजगाराचे महत्त्व सांगितले. आनंद निंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड