राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत एकूण रु.94 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.31 (जिमाका) :- दि.30 डिसेंबर व दि.31 डिसेंबर 2021 रोजी  राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त श्री. कांतीलाल उमाप    विभागीय उपायुक्त कोकण विभाग, ठाणे श्री.सुनिल चव्हाण यांच्या  आदेशानुसार रायगड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक श्री.आनंद पवार, दुय्यम निरीक्षक खालापूर, श्री.रितेश खंडारे, दुय्यम  निरीक्षक  श्री.मानकर, दुय्यम निरीक्षक रोहा श्री.संजय  वाडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती रजनी नरहरी, जवान निमेश नाईक, जवान गणेश घुगे, महिला जवान श्रीमती अपर्णा पोकळे व  महिला जवान वर्षा दळवी वाहनचालक  नरेश गायकवाड  व पंच  या पथकाने गाव मौजे आंजरूंग,आदिवासी वाडी, ता.खालापूर  येथे दि.30 डिसेंबर 2021  रोजी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर छापा टाकून एक  दुचाकी वाहन व  दि.  31 डिसेंबर 2021  रोजी  सकाळी  07:45 वाजता एक चारचाकी सेंट्रो  वाहन एमएच-04 बीक्यू 5958, दोनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत आसताना  रोहा-चणेरा रस्त्यावर कुंभोशी गावाजवळ  पाठलाग करून  पकडले.

  या दोन्ही  दिवशी  केलेल्या कारवाई अंतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल एकूण गुन्हे- 02, वारस -02, आरोपी- 02,वाहन - 1) होंडा ॲक्टिवा दुचाकी ( नंबर नसलेली), 2) सेंट्रो चार चाकी, एकूण हातभट्टी दारू- 260 लिटर, एकूण मुद्देमाल किंमत- रु. 94 हजार 150, असा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक श्री.आनंद पवार यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक