जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशु सप्ताहाचे उद्घाटन

 

 

रायगड (जिमाका) दि.17 :- जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथील प्रसुती कक्ष व नवजात बालक  कक्ष यांच्या माध्यमातून "राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह " कार्यक्रम दि.15 ते दि.21 नोव्हेंबर 2023 या कालावधी करिता साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात (गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर 2023) रोजी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्याहस्ते  कार्यक्रमाचे उदघाटन करुन करण्यात आली.

या कार्यक्रमाचे घोषवाक्य "आरोग्य संस्था व समुदायाद्वारे नवजात शिशूंचे पालनपोषण"  (Nurturing  Newborn lives Through Community - Facility Engagement") हे आहे. या कायर्क्रमाचा मुख्य उद्देश हा नवजात मृत्यु  दरमहा एक संख्येवर आणणे,  नवजात शिशु यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा (आरोग्य संस्थास्तरीय व सामाजिकस्तरीय ) यावर विशेष भर देणे,  नवजात शिशु यांना  देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी समाजामध्ये जनजागृती करणे असा आहे. 

 या कार्यक्रमाकरिता  अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शितल घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.आशिष मिश्रा, डॉ.आशिष पाटील, एसएनसीयु विभाग श्रीमती प्रभा तारी, सहाय्यक अधिसेविका तसेच बालरोगतज्ञ, परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका अस्मिता चव्हाण, परीसेवीका, मुकादम, आशा कार्यकर्ती, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या कार्यक्रमास उपस्थित होते.  

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक