निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावठी दारुचे अड्डे उध्वस्त करण्यास सुरुवात -------------------- लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त





रायगड दि १५; आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनूषंगाने रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे भरारी पथकांनी गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केल्याची माहिती विभागाच्या रायगड जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली.जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यात २८४ गुन्हे दाखल करण्यात आले. तर गावठी दारू निर्मितीतील १२५ जणांना अटक करण्यात अली आहेत. ८ वाहनेही जप्त करण्यात आली असून सर्व मुद्देमाल ४३ लाख ८७ हजार  रुपयांचा आहे.
त्याप्रमाणे परमिट रूमशी संबंध नसलेल्या ढाब्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे, रात्रभर चालणारे ढाबे, तिथे विकली जाणारी बेकायदेशीरपणे दारू, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार यांच्यावरही कारवाईचा बडगा उपसला आहे
नुकत्याच झालेल्या कारवाईत श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवे आगार वडवली येथून १८०० लिटर रसायन, ताडी १४५ लिटर, २०० लिटर गावठी दारू असा ५४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व ५४ गुन्हे दाखल केले. कर्जत तालुक्यातील आसल  ,पळसदरी येथे ४५०० लिटर रसायन, २० लिटर गावठी दारू, असा १ लाख ९ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
काल  एकूण दिवसभरात ७ प्रकरणात ४ जाणं अटक करण्यात आली तर १ वाहन जप्त  करण्यात आले. एकूण ४ लाख ६१ हजार ४५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. 

अनुज्ञप्तीसंदर्भातही दंड वसुली

रायगड जिल्ह्यात अनुज्ञप्ती संदर्भात १९० विसंगती आढळल्या त्यातील ७४ प्रलंबित आहेत पण उर्वरित बाबतीत १४ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
------------------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड