सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य-- निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के



रायगड, दि.7 (जिमाका) :- आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी  निवृत्त कर्नल किशोर कुमार मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गु.श. हरळय्या, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, जिल्हा माहिती अधिकारी  मनिषा पिंगळे, सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.साळुंखे तसेच युद्ध विधवा, वीरमाता, वीरपिता, आजी-माजी सैनिक, पत्रकार आणि ध्वजदिन निधी संकलनाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी निधी संकलनात सहकार्य करणार्‍या शाळा, संस्था व शासकीय कार्यालयांच्या प्रतिनिधींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. हरळय्या म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत सैनिक आपले कर्तव्य करतो, आपले प्रमुख कर्तव्य म्हणून ध्वज निधी संकलनात सहकार्य करावे, रोजगार स्वयंरोजगार साठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येईल.

निवृत्त कर्नल किशोर कुमार मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.साळुंखे यांनी केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक