जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

  

रायगड दि.4 (जिमाका) : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने पी.एन.पी कॉलेज गोंधळपाडा-वेश्वी येथे नुकताच जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.

यावेळी पी.एन.पी. कॉलेजचे प्राचार्य पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर, तहसिल कार्यालयातील अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी सचिन निकम, परीक्षक म्हणून लाभलेले सोनावणे, डॉ.ऍड.निहा राऊत, प्राजक्ता कोकणे, वंदना आंब्रे, ॲड. कला ताई पाटील, समीर मालोदे, डॉ. मेघा घाटे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार आदी मान्यवर व जिल्ह्यातील युवक-युवा वर्ग उपस्थित होते.

या महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, एकांकीका, पथनाट्य, कथा लेखन, वक्तृत्व,  पाककला, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी यांसारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या. तसेच दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये युवक-युवतींचा भरभरून प्रतिसाद लाभला. युवक-युवतींना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच जे स्पर्धक प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहेत त्यांची निवड विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धाकरिता करण्यात आली आहे.

हा युवा महोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, सिद्धार्थ खंडागळे, प्रफुल पाटील, सुरेंद्र कांबळे, अंकित मिंडे यांनी देखील परिश्रम घेतले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक